Ladki Bahin Yojana Status Check

राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळवून देणे आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र तसेच आरोग्य आणि पोषणात सुधारणा व्हावी या साठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु केली. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिला घेत असून दार महिन्याला १५०० रुपये त्यांच्या आधार लिंकीत बँक अकाउंट मध्ये जमा होत आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवारांनी आपले Ladki Bahin Yojana Status Check कसे करावे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाभार्थी महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज Approved झालेले आहेत किंवा नाही किंवा भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का अश्या अनेक गोष्टी Ladki Bahin Yojana Status च्या माध्यमातून आपल्याला तपासात येतात. तसेच हफ्ता आलेला आहे किंवा नाही, किती तारखेकेला हफ्ता आलेला आहे तसेच किती रुपये अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत इत्यादी माहिती Ladki Bahin Yojana Status Check केल्यानंतर कळते.

Ladki Bahin Yojana Status

Ladki Bahin Yojana Status

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेली महिलांसाठी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत तसेच बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे व काही कारणांमुळे काही महिलांचे अर्ज हे अमान्य देखील होत आहेत म्हणून एकदा अर्ज भरल्यावर त्याचे स्टेटस जाणून घेणे महत्वाचे असते. रिजेक्ट झालेले अर्ज जर काही तांत्रिक किंवा चुकीची माहिती किंवा चुकीचे कागदपत्रे अपलोड केल्यामुळे झाले असेल तर त्यात सुधारणा करून पुन्हा अर्ज करता येतो.

ज्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत अशा महिलांना आपला लाडकी बहीण योजनेचा हफ्ता व त्यासंबंधित स्टेटस सुद्धा जाणून घेता येते. आपल्या खात्यात आतापर्यंत किती हफ्ते जमा झालेले आहेत, कोणत्या बँक अकाउंट मध्ये हफ्ते जमा होत आहेत किंवा एखादा हफ्ता रिजेक्ट तर झालेला आहे किंवा नाही याचे पूर्ण स्टेटस जाणून घेता येत.

थोडक्यात लाडकी बहीण योजनेचे 2 प्रकारचे स्टेटस प्रामुख्याने आपल्याला चेक करता येतात ते खालील प्रमाणे आहे:

  • अर्जाची स्थिती (Application status)
  • हप्त्याची स्थिती (Installment Status)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची अर्जाची स्थिती व हप्त्याची स्थिती कशाप्रकारे बघावी याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Ladki Bahin Yojana Application Status

लाडकी बहिन योजनेच्या अर्जाची स्थिती बघण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी ऑनलाइन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
  • आता अर्जदार लॉगिन या पर्यायावरती क्लिक करा.
  • लाडकी बहीण योजना पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, Applications Made Earlier हा पर्याय निवडा.
  • आता तुम्ही इथे तुमच्या थेट अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकता.
Applications Status

वरील चित्रातप्रमाणे तुम्हाला तुमचे Application staus इथे बघायला मिळेल. जर अँप्लिकेशन स्टेटस Approved दाखवत असेल तर तुमचा अर्ज मान्य झालेला असतो आणि जर Rejected किंवा Unapproved स्टेटस दिसत असेल तर तुमचा अर्ज अमान्य झालेला आहे असा अर्थ होतो.

Ladki Bahin Yojana Installment Status

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेच्या हफ्त्यांची स्थिती बघण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
  • आता अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
  • आता, Applications Made Earlier हा पर्याय निवडा.
  • तुम्ही इथे तुमच्या थेट हप्त्याची स्थिती (Installment Status) पाहू शकता.
Application Transaction History

Installment Status मध्ये तुम्हाला एकूण हस्तांतरित रक्कम, व्यवहार स्थिती, व्यवहाराची तारीख, लाभार्थ्यांचे बँकेचे नाव, बँक अकाउंट नंबर अशी संपूर्ण अँप्लिकेशन transaction history बघता येते.

Ladki Bahin Yojana Status जाणून घेण्याची उद्देश्य

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेची स्थिती लाभार्थ्यांनी का जाणून घ्यावी याची उद्देश्य खालील प्रमाणे आहेत:

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्जाची स्थिती (Application status) हप्त्याची स्थिती (Installment Status) थेट ऑनलाइन पोर्टल च्या माध्यमातून जाणून घेता येते.
  • संबंधित उमेदवार चा अर्ज Approved, Rejected किंवा Unapproved झालेला आहे किंवा नाही याची स्थिती कळते.
  • जर अर्ज Approved झाला असेल तर पुढील प्रक्रिया करण्यास सोपे जाते जसे बँक सीडिंग आणि आधार लिंकेजची पडताळणी करता येते.
  • जर Approved Status असेल तर लाभार्थ्याला निश्चितपणे निधी हस्तांतरणाची प्रतीक्षा करता येते.
  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर Reject किंवा Unapproved झालेला असेल तर अर्ज तपशीलांचे पुनरावलोकन करण्यास सोपे जाते.
  • जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर संपादित करता येतो आणि पुन्हा सबमिट करता येतो.
  • संपूर्ण Application transaction history बघता येते.

Ladki Bahin Yojana Helpline Number

लाडकी बहीण योजनेशी संबंधित प्रश्न किंवा तक्रारी साठी महाराष्ट्र सरकार द्वारे 181 हा Helpline Number चालू करण्यात आलेला आहे, शिवाय खाली अजून संपर्क तपशील दिलेला आहे:

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक181
मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबर (24×7)1800 120 8040
ईमेल (योजनेशी संबंधित प्रश्नांसाठी)cm@maharashtra.gov.in
ईमेल (सामान्य प्रश्नांसाठी)psec.wchd@maharashtra.gov.in

FAQ

Ladki Bahin Yojana Status Check कसे करावे?

सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकारीक वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर जा, अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडून पोर्टल वरती लॉगिन करा. आता Applications Made Earlier हा पर्याय निवडा, आता तुम्ही तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती व हप्त्याची स्थिती पाहू शकता.

लाडकी बहिन योजनेची स्थिती तपासण्याची गरज का आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची स्थिती तपासल्याने लाभार्थ्यांचा अर्ज Approved किंवा Rejected /Unapproved झालेला आहे किंवा नाही याची माहिती मिळते त्यामुळे पुढील प्रक्रिया करण्यास सोपे जाते. याशिवाय इथे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची स्थिती सुद्धा जाणून घेता येते.

लाडकी बहिन योजनेची स्थिती पाहण्यासाठी थेट लिंक काय आहे?

मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेची स्थिती पाहण्यासाठी कोणतीहि थेट लिंक उपलब्ध नाही आहे, योजनेचे स्टेटस पाहण्याकरिता लाभार्थ्याला सर्वप्रथम लाडकी बहीण योजना पोर्टल वर लॉगिन करणे गरजेचे आहे. जर तुमच्या डिवाइस मध्ये आधीच लाडकी बहीण पोर्टल लॉगिन असेल तर तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/applied-list या लिंक चा वापर करून अर्जाची थेट स्थिती पाहू शकता तसेच https://ladakibahin.maharashtra.gov.in/transaction-log या लिंक चा वापर करून अनुप्रयोग व्यवहार इतिहास बघू शकता.

Home pageClick Here
Official websiteClick Here

Leave a Comment