Ladki Bahin Yojana Online Apply

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांच्या आरोग्यात व पोषणात सुधार व्हावा म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरवात केली. या योजनेत सहभाग घेण्यासाठी सर्वप्रथम पात्र महिला उमेदवारांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य ऑनलाइन अप्लाय करण्याची प्रक्रिया येथे नमूद केली आहे.

लाडकी बहिन योजना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) बाबत काही महत्वाच्या हायलाइट:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज हा ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ॲप आणि सेतू सुविधा केंद्रानंमध्ये ऑनलाईन करता येईल.
  • योजनेसाठी पात्र असेलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाही अशा महिलांसाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अशा विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे संबंधित महिलेचा थेट फोटो काढून ई-केवायसी करणे सोपे जाईल.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना लाभार्थी महिलेजवळ सर्व आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे. अर्ज भरताना कुटुंबाचे रेशनकार्ड तसेच स्वतःचे आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply

Ladki Bahin Yojana Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे:

  • सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधिकारीक संकेतस्थळाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ भेट द्या.
  • लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर “अर्जदार लॉगिन” हा पर्याय शोध व त्यावर क्लिक करा.
  • अर्जदार लॉगिन वर गेल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, आता Create Account हा पर्याय निवडा व क्लिक करा.
Create account
  • आता तुमच्या समोर एक Sign Up Form ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या Sign Up Form / Registration Form वरील माहिती खालील प्रमाणे भरावी:

Sign Up Form
  1. Full Name as per Aadhar (In English): उमेदवार महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड वर नमूद असल्याप्रमाणे इंग्रजी मध्ये भरा.
  2. Mobile No: दहा अंकी वैध मोबाईल नंबर प्रविष्ठ करा.
  3. Password: एक सुरक्षित पासवर्ड प्रविष्ठ करा.
  4. Confirm Password: पासवर्ड पुन्हा प्रविष्ठ करा.
  5. District: जिल्हा निवडा.
  6. Taluka: तालुका निवडा.
  7. Village: गाव निवडा.
  8. Municipal Corporation / Council: महानगरपालिका किंवा परिषद निवडा आणि Accept Terms and condition समोरील बॉक्सला चेक करा.
  9. Captcha: कॅप्चा भरा.
  10. Sign Up बटनावरती क्लिक करा.
  • आता, Sign Up बटनावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, येथे तुच्या द्वारे नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक चार अंकी OTP येईल.
  • OTP टाकून, Captcha भरा व Verify OTP या बटनावर क्लिक करा.
OTP Verification
  • Applicant’s Current Address & Information: OTP Verification केल्यानंतर नेक्स्ट विंडोवर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि माहिती विचारली जाईल ती काळजीपूर्वक भरा.
Applicant's Current Address & Information

अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि माहिती (Applicant’s Current Address & Information) खालीलप्रमाणे भरावी:

  • Applicant’s Full Address: या ठिकाणी अर्जदाराचा पूर्ण पत्ता प्रविष्ट करा.
  • Pincode: अर्जदाराचा पिन कोडे येथे प्रविष्ट करा.
  • District: अर्जदार राहत असलेल्या जिल्ह्याचे नाव प्रविष्ट करा.
  • Taluka: तालुक्याचे नाव प्रविष्ट करा.
  • Village: अर्जदाराच्या गावाचे नाव निवडा.
  • Municipal Corporation/Council: महानगरपालिका किंवा परिषद कोणती आहे ते निवडा.
  • Constituency: अर्जदाराचा मतदारसंघ निवडा.
  • Mobile No: अर्जदाराचा सक्रिय मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
  • Are You a Benificiary Of Any Other Financial Schemes Implemented By State/Central Government?: अर्जदार राज्य/केंद्र सरकारद्वारे लागू केलेल्या इतर कोणत्याही आर्थिक योजनांचे लाभार्थी आहे किंवा नाही याचे उत्तर Yes किंवा No मध्ये द्या.

Applicant’s Bank Details & Documents: इथे अर्जदाराचे बँक तपशील काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या आकारात अपलोड करा.

Applicant's Bank Details & Documents

अर्जदाराचा अचूक बँक तपशील खालीलप्रमाणे भरा:

  • Bank Full Name: अर्जदाराच्या बँकेचे पूर्ण नाव प्रविष्ट करा (उदा. HDFC BANK)
  • Account Holder’s Name: खातेधारकाचे नाव म्हणजेच अर्जदाराचे पूर्ण नाव बँक पासबुक वर असल्याप्रमाणे प्रविष्ट करा.
  • Bank Account No: अर्जदाराचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा.
  • Confirm Bank Account No: अर्जदाराचा बँक खाते क्रमांक पुन्हा प्रविष्ट करून बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा.
  • IFSC Code: खातेधारकाचा IFSC कोडे प्रविष्ट करा.
  • Is Your Bank Account Seeded With Bank Account?: अर्जदाराचे बँक खाते बँक खात्यासह सीडेड आहे की नाही याची पुष्टी करा, जर बँक खाते सीड केलेले नसेल तर बँक खाते आधारसह सीड करा आणि Yes किंवा No पर्याय निवडा.

अर्जदाराची आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे अपलोड करा:

Submit Application
  • Aadhar Card Front: अर्जदाराच्या आधार कार्ड चा समोरील बाजूचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
  • Aadhar Card Back: अर्जदाराच्या आधार कार्ड चा मागच्या बाजूचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
  • Domicile Certificate / Birth Certificate / School Leaving Certificate / Ration Card From 15 Years Ago / Voter ID From 15 Years Ago (Any One Of These): अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे शाळा सोडल्याचा दाखला / रेशन कार्ड / 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक प्रमाणपत्राचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
  • Do You Have Any Orange Or Yellow Ration Card: तुमच्याकडे नारंगी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? असेल तर Yes निवडा आणि नसेल तर No निवडा.
  • Applicant’s Hamipatra (Signature And Upload): अर्जदाराचे हमीपत्र येथे स्वाक्षरी सोबत अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर तुम्ही Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download करू शकता.
  • Bank Passbook: येथे अर्जदाराच्या बँक पासबुक चा समोरील फोटो (बँक तपशील) अपलोड करायचा आहे.
  • Applicant’s Photo: या ठिकाणी अर्जदाराचा स्पष्ट पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे.
  • Submit / Save As Draft: भरलेली माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे व्यवस्थित चेक करा आणि Submit बटनावर क्लिक करा. जर फॉर्म अर्धवट असेल किंवा एखादी माहिती किंवा डॉक्युमेंट उपलोड करायचे राहिले असेल तर तुम्ही Save As Draft वर क्लिक करू शकता.

संपूर्ण फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर, तुमचा अर्ज यशस्वीरित्या प्राप्त झाला आहे हे दर्शवणारा पुष्टीकरण संदेश किंवा ईमेल तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana Status Check कसे करावे?

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म यशस्वीरीत्या भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या Registered मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वरती अपडेट मिळतील, तरीही जर लाभार्थ्याची स्वहस्ते Ladki Bahin Yojana Status Check करणे सुद्धा शक्य आहे, लाडकी बहिन योजनेची स्थिती तपासण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  • सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जा.
  • आता अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा.
  • लॉगिन केल्यानंतर Applications Made Earlier हा पर्याय निवडा.
  • आता तुम्ही तुमच्या थेट अर्जाची स्थिती पाहू शकता.
Applications Status

या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकता, जर Application Status मध्ये Approved दिसत असेल तर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे असेल समजावे. जर Application Status मध्ये Unapproved किंवा Rejected असे चिन्ह दिसत असेल तर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर नाही किंवा अमान्य ठरलेला आहे असे समजावे.

जर तुमचा फॉर्म Approved झालेला असेल तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांची स्थिती जाणून घेऊ शकता, Installments Status जाणून घेण्याकरिता Action Buttons मधून Rupee Key/Transaction Key च्या चिन्हावर क्लिक करा.

Application Transaction History

Application Transaction History मध्ये तुमची लाभार्थ्याची हफ्त्यांचे संपूर्ण स्टेटस व इतिहास बघू शकता. आतापर्यंत किती हफ्ते जमा झाले, नाकारलेले हप्ते, बँकेचे नाव अशी बरीच माहिती या ठिकाणी बघायला मिळेल.

Ladki Bahin Yojana Documents (New Update)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या Documents ची यादी खालील प्रमाणे आहे:

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • वय प्रमाणपत्र
  • मूळ पत्ता पुरावा
  • शिधापत्रिका
  • स्व-घोषणा फॉर्म
  • लाडकी बहिन योजना अर्ज
  • आयकर विवरणपत्र किंवा कुटुंब प्रमुखाचे आयकर विवरण

लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थी महिलेकडे वरील डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे, योग्य कागदपत्र नसल्यास लाभार्थी महिलेचा फॉर्म अमान्य होण्याची शक्यता असते म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र लाभार्थ्यांकडे असणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार पात्रता निकष खालील प्रमाणे आहे:

  • वय: अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे
  • वैवाहिक स्थिती: विवाहित, अविवाहित, परित्यक्ता, घटस्फोटित आणि निराधार महिला
  • रहिवासी: लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असावी.
  • उत्पन्न: अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • बँक खाते: अर्जदाराच्या नावावर बँक खाते असावे

Ladki Bahin Yojana Helpline Number

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित प्रश्न किंवा तक्रारी साठी खाली संपर्क तपशील दिलेला आहे:

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक181
मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबर (24×7)1800 120 8040
ईमेल (योजनेशी संबंधित प्रश्नांसाठी)cm@maharashtra.gov.in
ईमेल (सामान्य प्रश्नांसाठी)psec.wchd@maharashtra.gov.in

FAQ

माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वर जा, त्यानंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा, नंतर Create Account वर क्लिक करून नवीन खाते बनवा, Registration Form भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व सबमिट बटनावर क्लिक करा.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची व रेजिस्ट्रेशन ची अंतिम तारीख 15 October 2024 आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील मूळ रहिवासी महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील.

लाडकी बहीण योजना अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

योजनेत नाव नोंदणीसाठी लाभार्थी महिलेकडे आधार कार्ड, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते तपशील, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि हमीपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Home pageClick Here
Official websiteClick Here

Leave a Comment