Ladki Bahin Yojana Last Date 2025

Ladki Bahin Yojana 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी रकम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळते. महिला सशक्तीकरण व महिलांचे आर्थिक तसेच शारीरिक पोषण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही योजना 2024 मध्ये सुरु करण्यात आलेली होती, सर्वात आधी या योजनेसाठी आवेदन करण्याची शेवटची तारीख ही ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत होती नंतर वाढत्या प्रतिसादामुळे तारीख विस्तार करून ३० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली. आता 2025 मधे ही अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत म्हणून Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025 महाराष्ट्र शासनाने सुरु करावे अशी मागणी लाडक्या बहिणींकडून होत असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवेदन प्रक्रिया केव्हा सुरु होईल किंवा सुरु होईल किंवा नाही याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

Ladki Bahin Yojana Last Date 2025

Ladki Bahin Yojana Last Date

लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन प्रक्रिया सध्या बंद आहे, ३० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. ज्या महिला लाभार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आत आवेदन प्रक्रिया पूर्ण केली व ज्यांचे अर्ज मान्य झाले अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ होतांना दिसून येत आहे परंतु ज्या महिला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकलेल्या नाहीत अशा महिला Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025 ची वाट बघतांना दिसून येत आहे.

आतापर्यंत राज्यातील २.५२ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून ७ मार्च २०२५ पर्यंत फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हफ्ता (आठवा, नववा हप्ता) लाभार्थी महिलांचा बँक अकाउंट मध्ये DBT द्वारे हस्तांतरण करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे की २०२५-२६ या वार्षिक वर्ष मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ३६,००० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

लाडकी बहिन योजनेसाठी कोण पात्र आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पात्रता निकष (Ladki Bahin Yojana Eligibility Criteria) खालील प्रमाणे आहे:

  • योजनेत सहभागी होणारी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
  • लाभार्थी महिलेचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • सदर महिला उमेदवाराच्या कुटुंबात आयकर भरणारा सदस्य नसावा.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबात कोणी सदस्य सरकारी विभागात, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (PSU), मंडळात किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायमस्वरूपी कर्मचारी इत्यादी नसावा.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबांमध्ये विद्यमान किंवा माजी खासदार (खासदार) किंवा विधानसभेचे सदस्य (आमदार) नसावेत.
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये सदस्य सरकारी मंडळ, महामंडळ किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य म्हणून काम करत नसावेत.
  • लाभार्थी महिला उमेदवाराच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) त्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे.

लाडकी बहिन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे:

  • लिंग निकष (Gender Criteria): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त महिलांसाठी असून त्यांचा आर्थिक स्वातंत्र्य, पोषण आणि कल्याणासाठी आहे.
  • वयाची आवश्यकता (Age Requirement): अर्जदाराचे वय किमान २१ आणि कमाल ६५ वर्षे असावे.
  • निवासी आवश्यकता (Residency Requirement): अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • उत्पन्नाचे निकष (Income Criteria): कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • वैवाहिक स्थिती (Marital status): विवाहित, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार किंवा अविवाहित महिला पात्र.
  • बँक खाते (Bank Account): अर्जदाराचे बँक खाते (आधार सीडींग सोबत) असावे.
  • आवश्यक कागदपत्रे (Required Documents): आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, फोटो, बँक पासबुक, वय प्रमाणपत्र, पत्ता पुरावा, शिधापत्रिका, स्व-घोषणा फॉर्म, अर्ज, आयकर विवरणपत्र.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करावा?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधिकारीक वेबसाईट ला भेट द्या (https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर “अर्जदार लॉगिन” हा पर्याय शोधा व क्लिक करा.
  • आता Create Account हा पर्याय निवडा व क्लिक करा.
Create account
  • आता, Sign Up फॉर्म मध्ये लाभार्थी अर्जदाराची आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
Sign Up Form
  • फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्या आणि Sign Up बटनावर क्लिक करा.
  • Sign Up बटण वर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, येथे तुमच्या द्वारे नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक चार अंकी OTP मिळेल.
  • OTP टाकून, Captcha भरा Verify OTP या बटनावर क्लिक करा.
OTP Verification
  • OTP Verification केल्यानंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि माहिती (Applicant’s Current Address & Information) काळजीपूर्वक भरा.
  • आता, अर्जदाराचे बँक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित तपासा, त्यानंतर Submit बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची व अर्जाची स्थिती कशी तपासायची?

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची व अर्जाची स्थिती कशी तपासण्यासाठी खालील चरणांचे पालन करा.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी वेबसाईटला जा (https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
  • आता अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा.
  • पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, Applications Made Earlier या पर्यायावरती क्लिक करा.
  • आता तुम्ही इथे तुमच्या थेट अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकता.
  • तुम्ही इथे तुमच्या हप्त्याची स्थिती (Installment Status) सुद्धा पाहू शकता.

लाडकी बहिन योजनेची कागदपत्रे (नवीन अपडेट)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या Documents ची List खालील प्रमाणे आहे:

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक
  • वय प्रमाणपत्र
  • मूळ पत्ता पुरावा
  • शिधापत्रिका
  • स्व-घोषणा फॉर्म
  • लाडकी बहिन योजना अर्ज
  • आयकर विवरणपत्र किंवा कुटुंब प्रमुखाचे आयकर विवरण

FAQ

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अजूनही उपलब्ध आहे का?

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. सध्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म उपलब्ध नाही.

महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आली होती. नवीन अर्ज प्रक्रिया सध्या सक्रिय नाही.

Home pageClick Here
Official websiteClick Here

Leave a Comment