Ladki Bahin Yojana Documents

महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी रकम दिली जाते. या योजनेत सहभाग हेण्यासाठी इच्छुक महिला उमेदवाराला लाडकी बहीण योजना पात्रता निकष चे अनुसरण करणे तसेच लाडकी बहीण योजना कागदपत्रांची आवश्यकता जाणून घेणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या महत्वपूर्ण कागदपत्रांची माहिती येथे दिलेली आहे.

लाडकी बहिन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Ladki Bahin Yojana Documents Required) बाबत काही महत्वाच्या हायलाइट:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे, म्हणून लाभार्थी महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवासपत्र असणे आवश्यक आहे.
  • लाडकी बहीण योजनेत सहभाग घेणाऱ्या महिला उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • महिलेकडे अधिवासी प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न हे २.५० लाख पेक्षा कमी आहे हे सिद्ध करणारा उत्पन्नाचा दाखला महिलेकडे असणे गरजेचे आहे.
  • ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालेल.
  • पांढरे रेशनकार्ड धारक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana Documents Required

Ladki Bahin Yojana Documents

Ladki Bahin Yojana मध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थी महिलांकडे काही गरजेची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी लागणाऱ्या Documents ची यादी खालील प्रमाणे आहे.

  • आधार कार्ड: लाभार्थी महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे लागते तसेच अर्जामध्ये आधार कार्ड चा मागील व पुढील भागांचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अधिवास प्रमाणपत्र: लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे हे सिद्ध करणारे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र नसल्यास महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे: १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक.
  • उत्पन्नाचा दाखला: लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. २.५० लाखापेक्षा कमी आहे हे सिद्ध करणारा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक.
  • पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका: जर लाभार्थी महिलेकडे पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • नवविवाहितेच्या बाबतीत: लाभार्थी नवविवाहित महिलेचे नाव जर तिच्या नावाची नोंद नसेल तर अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  • बँक खाते तपशील: लाभार्थी महिलेकडे आधार सोबत लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. अर्ज करताना बँक पासबुक च्या पहिल्या पृष्ठाचा फोटो आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलेचे हमीपत्र: अर्ज करताना लाभार्थी महिलेकडे स्वतःची स्वाक्षरी केलेले हमीपत्र असणे आवश्यक आहे. (हमीपत्र डाउनलोड करा).
  • लाभार्थी महिलेचा फोटो: योजनेत सहभागी होण्याकरिता लाभार्थी महिलेचा पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.

वरील यादीतील कागदपत्रे लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेकडे नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे असणे गरजेची आहे. जर काही कारणांमुळे कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असल्यास संबंधित महिला लाभार्थी अपात्र देखील ठरू शकते. म्हणून लाभार्थी महिलांनी याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे.

लाडकी बहिन योजना पात्रता आणि अपात्रता तपासक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना पात्रता परीक्षक (Ladki Bahin Yojana Eligibility Checker) या ऑनलाइन टूल चा वापर करू शकता. या टूल मध्ये तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातात ते वाचून हो किंवा नाही पैकी एक पर्याय निवडायचा आहे.

















Ladki Bahin Yojana Online Form (Apply)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता खालील चरणांचे अनुसरण करा:

  • आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधिकारीक ऑनलाइन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
  • लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वर (संकेतस्थळावर) गेल्यानंतर “अर्जदार लॉगिन” हा पर्याय शोधा व क्लिक करा.
  • आता नवीन विंडो ओपन होईल, इथें Create Account हा पर्याय निवडा व क्लिक करा.
Create account
  • आता, Sign Up फॉर्म मध्ये अर्जदाराची आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
Sign Up Form
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्या आणि Sign Up बटनावर क्लिक करा.
  • Sign Up वर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, येथे तुमच्या द्वारे नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर एक चार अंकी OTP मिळेल.
  • OTP टाकून, Captcha भरा व Verify OTP या बटनावर क्लिक करा.
OTP Verification
  • OTP Verification नंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि माहिती (Applicant’s Current Address & Information) काळजीपूर्वक भरा.
  • आता, अर्जदाराचे बँक तपशील काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित तपासा, त्यानंतर Submit बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.

Ladki Bahin Yojana Status Check प्रक्रिया

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
  • आता अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा.
  • लॉगिन केल्यावर, Applications Made Earlier हा पर्याय निवडा.
  • आता तुम्ही तुमच्या थेट अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकता.
  • हफ्त्यांची स्थिती (Installment Status) पाहण्यासाठी Action Buttons मधून Rupee Key/Transaction Key च्या सिम्बॉल वरती क्लिक करा.

Ladki Bahin Yojana Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै 2024 मध्ये अर्ज घेण्यास सुरुवात झाली आणि मूळ मुदत 30 ऑगस्ट 2024 होती. राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. अनेक महिलांना सहभागी व्हायचे असल्याने, राज्य सरकारने आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम मुदत बदलून 30 सप्टेंबर 2024 केली.

आता 2025 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्जप्रक्रिया कधी सुरु होईल याबाबत कोणतीही आधिकारीक माहिती किंवा घोषणा आधिकारीक सूत्रांकडून जाहीर झालेली नाही. योजनेची अर्जप्रक्रिया पुन्हां सुरु व्हावी अशी मागणी लाखों महिलांची आहे.

FAQ

लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट साईझचा फोटो, बँक पासबुक, वय प्रमाणपत्र, मूळ पत्ता पुरावा, शिधापत्रिका, स्व-घोषणा फॉर्म, लाडकी बहिन योजना अर्ज, आयकर विवरणपत्र किंवा कुटुंब प्रमुखाचे आयकर विवरण इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी २१ ते ६५ वयोगटातील महिला, लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांहून कमी आहे, लाभार्थी महिला विवाहित, परित्यक्ता, घटस्फोटित आणि निराधार आहे अशा महिला उमेदवार माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नाव कसे तपासायचे?

लाडकी बहीण योजनेत नाव तपासण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा:
लाडकी बहीण योजनेची साईट Ladakibahin.maharashtra.gov.in ओपन करा
योजनेच्या लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी प्रविष्ट करा.
तुमची स्थिती तपासण्यासाठी सबमिट करा वर क्लिक करा.

Home pageClick Here
Official websiteClick Here

Leave a Comment