मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra): महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हाव्यात या उद्देशातून राज्यसरकार च्या महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविण्यात आलेली” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना” या योजने ची सुरुवात २०२४ मध्ये करण्यात आली. या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र स्त्रियांना १,५०० रुपये प्रति महिना अशी रक्कम देण्यात येते, हि रक्कम थेट लाभार्थी स्त्रियांच्या बँक अकाउंट मध्ये एका विशिष्ट तारखेला जमा होते. एप्रिल 2025 पासून या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना १,५०० रुपयाच्या ऐवजी २,१०० रुपये प्रति महिना इतकी रकम मिळणार आहेत.
राज्यातील मुली व स्त्रियांना पुरेश्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व रोजगार निर्मितीस चालना मिळावी या उद्देशातून महाराष्ट शासनातर्फे या योजनेची घोषणा करण्यात आलेली असून ladakibahin.maharashtra.gov.in ही या लिंकचा वापर करून इच्छुक स्त्रिया ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करू शकतात.
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिला किंवा परिवारातील केवळ एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. तसेच महिलेचं वय २१ ते ६५ दरम्यान असावे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
Ladki Bahin Yojana 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी “Ladki Bahin Yojana” या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील मुली व महिलांना सुशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील महिलांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी हा या योजनेचा उद्देश्य आहे.
महाराष्ट्र राज्यातील योजने साठी पात्र असलेल्या प्रत्येक स्त्री च्या आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये DBT द्वारे प्रति महिन्याला १५०० रुपये दिले जातील हे या योजने चे मूलभूत स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ मध्ये या योजनेची सुरुवात महिलांच्या कल्यानाहेतू केली. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील रहिवासी मुली व माहिला या योजनेस पात्र आहेत.
या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रहिवाशी महिला पात्र आहेत. Ladki Bahin Yojana ची जिल्हानिहाय माहिती खाली दिली आहे.

Ahmednagar | Akola | Amravati |
Aurangabad | Beed | Bhandara |
Buldhana | Chandrapur | Dhule |
Gadchiroli | Gondia | Hingoli |
Jalgaon | Jalna | Kolhapur |
Latur | Mumbai City | Mumbai Suburban |
Nagpur | Nanded | Nandurbar |
Nashik | Osmanabad | Palghar |
Parbhani | Pune | Raigad |
Ratnagiri | Sangli | Satara |
Sindhudurg | Solapur | Thane |
Wardha | Washim | Yavatmal |
Ladki Bahin Yojana Overview
राज्यातील स्त्रियांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या हेतू ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ची सुरुवात महाराष्ट्र राज्य शासनाने केलेली आहे, या योजनेचा विहंगावलोकन खालील प्रमाणे आहे.
Scheme Name | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana |
Ministry | Department of Women and Child Development Maharashtra |
Launch Date | July 2024 |
Status | Active |
Launch by | Maharashtra state government under the leadership of CM Shri Eknath Shinde |
Budget | ₹46,000 crore. |
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र राज्यातील गरजू आणि गरीब (२.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न) असलेल्या महिलांसाठी Majhi Ladki Bahin Yojana राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे. राज्यातील गरजू मुली व महिलांना आर्थिक मदत मूळवून देणे आणि त्यांचे कल्याण व्हावे हाच या योजने पाठीमागील मूळ उद्देश्य आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर कार्यरत असतांना “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” या ऐतिहासिक व कल्याणकारी योजनेची घोषणा २०२४ मध्ये केली, या योजनेसाठीचा बजेट हा सुमारे ₹46,000 करोड इतका आहे.
महाराष्ट्र राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक मदत मिळावी व त्या सशक्त व्हाव्यात या साठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. विशेषतः राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांसाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेकडे काही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे जसे कि आधार कार्ड, बँक खाते पासबुक, आय प्रमाणपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट साइज फोटो व हमीपत्र इत्यादी. कागदपत्रे Mazi Ladki Bahin Yojana Online form भरताना गरजेची आहेत.
लाडकी बहीण योजनेत सहभाग घेऊ इच्छिणारी माहिला लाभार्थी ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे असून संबंधित माहिला ही २१ ते ६५ या वयोगटातील असावी तरच या योजनेस पात्र ठरेल.
Ladki Bahin Yojana Eligibility
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना महाराष्ट्र शासनातर्फे काही पात्रता निकष घालण्यात आलेले आहेत, Ladki Bahin Yojana Registration Form भरताना अर्जदारांना या नियम व अटींचे पालन करणे अनिवार्य आहे, अन्यथा उमेदवाराचा फॉर्म रद्द होऊ शकतो. लाडकी बहिन योजना पात्रता निकष खालील प्रमाणे आहे.
- योजनेसाठी अर्ज करणारी महिला अर्जदार ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिला ही विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला असली पाहिजे किंवा कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी पात्र ठरेल.
- राज्यातील फक्त २१ ते ६५ या वयोगटातील मुली व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक अकाउंट लाभार्थी महिलेकडे असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी स्त्री च्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील लाडकी बहीण योजना ही एक मोठी व महत्वाची योजना आहे, या योजनेवर राज्य सरकार करोडो रुपये खर्च करते आणि लाखो गरजू महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. पण या योजनेचा लाभ खरोखर गरजवंत महिलांनाच व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी “पात्रता” व “अपात्रता” अति घालण्यात आल्या आहेत, योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या पात्रता व अपात्रता सूचीचे निरीक्षण करावे.
पात्रता | अपात्रता |
---|---|
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक. | ज्या उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रु. २.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते या योजनेस अपात्र ठरतील. |
महाराष्ट्र राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. | ज्या उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता (Income tax payer) आहेत. |
लाभार्थी महिला किंवा मुलीचे वय हे कमीत कमी २१ व जास्तीत जास्त ६५ वर्ष इतके असावे. | ज्या महिला उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. |
लाभार्थी उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. | रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. |
सदर महिला उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य जर विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे तर संबंधित उमेदवार योजनेस अपात्र ठरेल. | |
ज्या महिला उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत अशा महिला उमेदवार या योजनेसाठी अपात्र आहेत. | |
सदर महिला उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत आहे ती महिला उमेदवार योजनेस अपात्र ठरेल. | |
सदर लाभार्थी महिला उमेदवार जर शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर योजनेस अपात्र ठरेल. |
Ladki Bahin Yojana Documents
Ladki Bahin Yojana मध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांकडे काही गरजेची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी लागणाऱ्या Documents ची यादी खालील प्रमाणे आहे.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र (यांपैकी एक)
- रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला (यांपैकी एक)
- हमीपत्र
- बँक पासबुक (आधार लिंक असणे आवश्यक)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Features of Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहायता करून त्या सशक्त व्हाव्यात या उद्देशातून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक कल्याणकारी योजना 2024 मध्ये सुरु केली, या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतील.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांना आर्थिक मदत मिळवून देणे व सक्षम बनविणे.
- मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकार ने ही योजना २०२४ मध्ये लाँच केली आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- ज्या कुटुंबात फक्त एक अविवाहित महिला आहे, तिला या योजनेचा लाभ घेता येईल.
- लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील फक्त 21 ते 65 वयोगटातील मुली व माहिला लाभ घेऊ शातील.
- लाभार्थी महिला उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
- आर्थिक मदत पारदर्शकतेसाठी रकम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
- ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असून, लाखो महिलांना या योजनेचा लाभ होत आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेपासून प्रेरित आहे, जिने राज्यात लोकप्रियता मिळवली.
- लाडकी बहीण योजनेची सुरळीत अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
- महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे हा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे.
- लाडकी बहीण योजनेचा बजेट ₹46,000 करोड इतका आहे.
- या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या माहिला लाभार्थीकडे आधार कार्ड आणि आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.
- माहिला लाभार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र यांपैकी एक असणे गरजेचे आहे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थी महिलेकडे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला (यांपैकी एक) असणे गरजेचे आहे.
- योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलेने स्व-स्वाक्षरी केलेले हमीपत्र देणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र अश्या विविध माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतो. ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू यांपैकी कोणत्याही एका पर्यायाच्या साहाय्याने अर्ज भारत येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधिकारीक संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in/ भेट द्या.
- लाडकी बहीण योजनेचा आधिकारीक पोर्टल तुमच्यासमोर उघडेल, येथे योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे इत्यादी संपूर्ण माहिती मिळेल.
- लाडकी बहीण योजनाच्या Online Portal वर आल्यानंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा आणि क्लिक करा.
- अर्जदार लॉगिन वर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, आता Create Account हा पर्याय निवडा व क्लिक करा.

- आता तुमच्या समोर एक Sign Up Form ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा Sign Up Form / Registration Form खालील प्रमाणे भरावा:
- Full Name as per Aadhar (In English): उमेदवार महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड वर नमूद असल्याप्रमाणे जसेच्या-तसे इंग्रजी मध्ये भरा.
- Mobile No: दहा अंकी वैध मोबाईल नंबर प्रविष्ठ करा.
- Password: एक सुरक्षित पासवर्ड प्रविष्ठ करा.
- Confirm Password: पासवर्ड पुन्हा प्रविष्ठ करा.
- District: जिल्हा निवडा.
- Taluka: तालुका निवडा.
- Village: गाव निवडा.
- Municipal Corporation / Council: महानगरपालिका किंवा परिषद निवडा आणि Accept Terms and condition समोरील बॉक्सला चेक करा.
- Captcha: कॅप्चा भरा.
- Sign Up बटनावरती क्लिक करा.
- Sign Up बटनावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल, येथे तुच्या द्वारे नोंदणी केलेल्या मोबाईल वरती एक OTP येईल.
- चार अंकी OTP टाकून, Captcha भरा व Verify OTP या बटनावर क्लिक करा.

- Applicant’s Current Address & Information: OTP Verification केल्यानंतर अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि माहिती विचारली जाईल ती काळजीपूर्वक भरा.

- Applicant’s Bank Details & Documents: अर्जदाराचे बँक तपशील काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या आकारात अपलोड करा.

- Submit Application: संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाल्यावर व्यवस्थित तपासा, जी कागदपत्रे मागितली आहे ती व्यवस्थित अपलोड केलेली आहेत का याची खात्री करा त्यानंतर Submit बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमचा अर्ज यशस्वीरित्या प्राप्त झाला आहे हे दर्शवणारा पुष्टीकरण संदेश किंवा ईमेल तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.
Ladki Bahin Yojana Status Check
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे Status पाहण्याकरिता खालील चरणांचे अनुसरण करा:
- सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकारी वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.
- आता अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा.
- लॉगिन केल्यानंतर Applications Made Earlier हा पर्याय निवडा.
- आता तुम्ही तुमच्या थेट अर्जाची स्थिती पाहू शकता.

- लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यांची स्थिती जाणून घेण्याकरिता Action Buttons मधून Rupee Key/Transaction Key च्या सिम्बॉल वरती क्लिक करा.

Ladki Bahin Yojana Helpline Number
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित प्रश्न किंवा तक्रारी साठी महाराष्ट्र सरकार द्वारे 181 हा Helpline Number चालू करण्यात आलेला आहे, शिवाय खाली अजून संपर्क तपशील दिलेला आहे:
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक | 181 |
मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबर (24×7) | 1800 120 8040 |
ईमेल (योजनेशी संबंधित प्रश्नांसाठी) | cm@maharashtra.gov.in |
ईमेल (सामान्य प्रश्नांसाठी) | psec.wchd@maharashtra.gov.in |
FAQ’s
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यात तसेच पोषणात सुधारणा व्हावी व कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही एक कल्याणकारी व आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारी योजना आहे. पात्र महिलांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी ₹१,५०० ची मासिक आर्थिक मदत देण्यात येते.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र चे स्टेटस कसे चेक करावे?
लाडकी बहीण योजने चे अँप्लिकेशन स्टेटस तसेच हफ्त्यांचे स्टेटस जाणून घेण्याकरिता सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या लाडकी बहीण योजनेच्या आधिकारी संकेतस्थळाला भेट द्या, नंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडा. लॉगिन केल्यानंतर Applications Made Earlier हा पर्याय निवडा, आता तुम्ही तुमचे अँप्लिकेशन स्टेटस तसेच हफ्त्यांचे स्टेटस बघू शकता.
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी, 21 ते 60 वर्षे वयोगटातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, सरकारी कर्मचारी किंवा करदाता नसावा इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या महिलांसाठी ही योजना उपलब्ध आहे.
लाडकी बहीण योजने अंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते?
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात.
मी योजनेसाठी अर्ज कसा करू शकते?
पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात: अधिकृत सरकारी वेबसाइट (https://ladakibahin.maharashtra.gov.in/), जवळची सरकारी कार्यालये (ग्रामपंचायत, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय) किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC).
अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आवश्यक कागदपत्रांमध्ये हे समाविष्ट आहे: आधार कार्ड, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते तपशील, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि हमीपत्र.
लाभार्थ्यांना रक्कम कधी मिळण्यास सुरुवात होईल?
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या तारखेपासून ही आर्थिक मदत दार महिन्याला लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
Home page | Click Here |
Official website | Click Here |